Latest News

माढा तालुका अध्यक्ष पदी विनायक चौगुले यांची निवड..

Share

Facebook
WhatsApp
LinkedIn
Telegram
Twitter

अंजनगाव खेलोबा – (ता. माढा) येथील सामाजिक कार्यकर्ते व आमदार बबनराव शिंदे आणि जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांचे समर्थक विनायक राजाराम चौगुले यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया सेलच्या माढा तालुकाध्यक्ष पदी निवड झाली आहे. या निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष बापूसाहेब पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी भवन सोलापूर येथे बुधवार, दि.२२ मे रोजी सुपूर्त करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे, राजकीय व सामाजिक घडामोडीवरील भूमिका जनतेसमोर मांडण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष मा अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सोशल मीडिया प्रदेशाध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांच्या आदेशानुसार माढा तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली..
यावेळी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सज्जनराव जाधव, जिल्हा सरचिटणीस डाँ राज साळुंखे पदाधिकारी उपस्थित होते..