Latest News

मंत्रीमंडळ बैठकीत तुमच्या आमच्या हक्काच्या सरकारनं घेतले महत्वाचे निर्णय..

Share

Facebook
WhatsApp
LinkedIn
Telegram
Twitter

मुंबई | Mumbai
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची (State Cabinet) बैठक पार पडली. या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.


देहरजी मध्यम पाटबंधारे प्रकल्प, ता. विक्रमगड, जि. पालघरसाठी २५९९.१५ कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पातून ६९.४२ दलघमी पाणीसाठा वसई-विरार महापालिकेच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित ठेवला जाईल.


जनाई शिरसाई उपसा सिंचन योजना (Upsa Irrigation Scheme) ता. दौंड, बारामती आणि पुरंदर जि. पुणे योजनेच्या कालव्यांना बंदिस्त नलिका वितरण प्रणालीत रुपांतरण करण्याच्या कामासाठी विस्तार व सुधारणा अंतर्गत ४३८.४८ कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

https://x.com/bapupatilspeak/status/1889282338896662984?s=46
  • जनाईतून दौंड, बारामती, पुरंदर तालुक्यातील अवर्षण भागात ८३५० हेक्टरला सिंचन.
  • शिरसाईतून बारामती, पुरंदरच्या अवर्षण भागात ५७३० हेक्टरला सिंचन.
  • ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली.
  • मराठीतील ग्रामीण साहित्य चळवळीचा पैस वाढवणारे, नवोदित लेखकांना प्रोत्साहन आणि बळ देणाऱ्यांत बिनीचे शिलेदार ठरतील अशा प्रा. रा. रं. बोराडे (RR Borade) यांचे निधन या चळवळीची हानी आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ साहित्यिक, ग्रामीणकथाकार प्रा. रा. रं बोराडे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

प्रा. बोराडे यांना जाहीर झालेला विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यापुर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतला, हे दुख:द असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, ‘पाचोळाकार’ म्हणून लोकप्रियता मिळविणारे प्रा. बोराडे मराठीचे अध्यापन, साहित्य चळवळ अशा सर्वच ठिकाणी हिरीरीने पुढे राहीले. प्रा. बोराडे यांनी आपल्या अस्सल ग्रामीण साहित्यकृतींनी साहित्यात मोलाची भर घातली. देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्यपद त्यांनी भुषविले. अनेक साहित्यिक, नवोदितांसाठी ते मार्गदर्शक म्हणून आदरस्थानी होते. त्यांनी ग्रामीण साहित्य चळवळ आणि त्यातील विविध प्रवाहांना बळ दिले. त्यांच्या निधनाने (Passed Away) मराठी साहित्य क्षेत्रातील समर्पित सेवायात्री हरपल्याची भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. प्रा.बोराडे यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून, त्यांचे कुटुंबिय, चाहते यांच्या दु:खात सहभागी आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे.

महायुती सरकार…

महाराष्ट्र